Share

महाराष्ट्रात आमचा उपमुख्यमंत्री नाही, याची खंत आहेच…

Published On: 

नागपूर: सद्यस्थितीत सोशल डिस्टंसिंग पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्हाला कुठलीही समस्या असली की पत्र लिहून कळवली जाते. त्यानंतर त्यावर चर्चा होते आणि मग मुख्यमंत्र्यांशी भेटून प्रश्‍न सोडविला जातो. आमच्या व्यथांबाबत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पत्रव्यवहार करीत असतात. राज्य सरकारने केलेल्या किंवा करावयाच्या कामांच्या फलकावर नियमानुसार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो असतात. त्यामुळे त्या फलकांवर आमचे फोटो नाहीत, याची आम्हाला अजिबात खंत राहत नाही. पण आमचा उपमुख्यमंत्री नाही, याची खंत जरूर आहे, असे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत.

राज्य सरकारने केलेल्या कामांची फलकं लावली जातात, त्यावर कॉंग्रेसच्या मंत्र्यांचे फोटो नसतात. त्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांना वेगळी फलकं लावावी लागतात. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॉंग्रेसचा कोंडमारा होतोय, असे सर्वत्रच बोलले जात आहे. याबाबत विचारले असता डॉ. राऊत यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. कॉंग्रेसच्या काही नेत्यांकडून नाराज असल्याबद्दल वरिष्ठांसोबत पत्रव्यवहारही केला जात आहे.

याबाबत डॉ. राऊत म्हणाले, सद्यस्थितीत सोशल डिस्टंसिंग पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्हाला कुठलीही समस्या असली की पत्र लिहून कळवली जाते. त्यानंतर त्यावर चर्चा होते आणि मग मुख्यमंत्र्यांशी भेटून प्रश्‍न सोडविला जातो. आमच्या व्यथांबाबत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पत्रव्यवहार करीत असतात. मी ब्राह्मणद्वेष्टा नाही ब्राह्मणद्वेष्टा असल्याचा आरोप माझ्यावर केला जातो.

पण मी ब्राह्णणद्वेष्टा अजिबात नाही. अनेक ब्राह्मण नेते माझे मित्र आहेत. अनेक वर्गमित्र ब्राह्मण होते. ते आजही संपर्कात असतात, भेटतात. मैदानातील एखाद्या जाहीर सभेत बोलताना अनेकांची जीभ घसरते. एका सभेत मी काही बोललो असेल तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाला धरून काही लिहिले असेल, तर ते मी बोललो. ते माझे वैयक्तिक मत नव्हते. माझे आजही सर्वांशी चांगले संबंध आहे. हे सांगताना ‘त्यावेळी’ जिभ घसरली होती, याची कबुलीच डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!