🕒 1 min read
मुंबई : राज्याचा कारभार जिथून चालवला जातो, त्या मंत्रालयात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मंत्रालयातील उपहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. मंत्रालयात राजपात्रित अधिकाऱ्यांच्या उपहारगृहाच्या खालील बाजूस हे एक रुम आहे. तिथे हे धक्कादायक चित्र आढळून आले.
या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याचं कारणही महत्वाचं आहे. जर सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. पण मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? असा प्रश्न सध्या सर्वच स्तरांतून व्यक्त केला जात आहे.
यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणाले मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडणे हा अतिशय गंभीर विषय आहे, उद्धव ठाकरे यांनी राज्यप्रमुख म्हणून सखोल चौकशी आणि दोषींवर कारवाई करावी. अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, भाजपचे अनेक नेते यावर वक्तव्य करत आहे. आणि सरकारला जाब विचारत आहेत.
मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडणे हा अतिशय गंभीर विषय आहे, उद्धव ठाकरे यांनी राज्यप्रमुख म्हणून सखोल चौकशी आणि दोषींवर कारवाई करावी ! pic.twitter.com/I5qtY1KetU
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 10, 2021
तसेच, भाजप नेते निलेश राणे यांनी याच मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे सरकार असताना मंत्रालयात दारूच्या बाटल्या मिळणार नाही तर काय अगरबत्तीचा स्टॉक मिळणार?? मंत्रालयात कुठल्या स्तराचं काम चालू आहे यावरून लक्षात येते. सरकारची भीती मंत्रालयात सुद्धा राहिलेली नाही, आता हे सरकार फक्त चौकशीचे आदेश देणार आणि माहिती काढणार कोण कुठल्या ब्रँडची पितो अशी टीका त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
-
- ‘सगळं ठाकरे सरकारच झिंगलंय कारण कुटुंब वसुलीत रंगलय’
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
- ठरलं ! 17 ऑगस्टपासून राज्यातील ‘या’ इयत्तेचे वर्ग भरणार
- नांदेड विभागातून तीनशेवी किसान रेल्वे सुसाट; महसूलात कोटींनी वाढ!
- मंत्रिमंडळ “खो खो” आणि अनिल देशमुख सध्या लपाछपी खेळताय, भाजपचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
