नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या संकटातून भारत काहीसा बाहेर येत असतानाच आता संपूर्ण जगावर कोरोनाच्या डेल्टा विषाणूचे संकट समोर आले आहे. कोरोनाचा विषाणू हा सध्या अवघ्या जगाची डोकेदुखी ठरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संभाव्य हानी टाळण्यासाठी जगभरात सध्या मोठ्याप्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे जगभरातल्या सर्वच देशांनी आपापल्या देशातील कोरोना लसीकरणाची गती वाढवावी अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.
दरम्यान आता कोरोना मुक्तीचा दावा करणाऱ्या इस्रायलमध्ये पुन्हा कोरोनाने डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून लागू करण्यात आलेले निर्बंध पुन्हा कठोर केले जात आहेत. तसेच सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार इस्रायलमध्ये कोणत्याही कार्यक्रमात प्रवेश करू इच्छिणाऱ्या नागरिकांना आपल्या लसीकरणाचा किंवा कोव्हिड निगेटिव्ह असल्याचा अहवाल दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
वय वर्षं 3 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक नागरिकासाठी हा नियम लागू असेल, असं इस्रायल प्रशासनाने म्हटलं आहे. देशातील रेस्टॉरंट, कॅफे, म्यूझियम, लायब्ररी, जिम, स्विमिंग पूल यांसारख्या ठिकाणी ग्रीन पास सिस्टिम लागू करण्यात आली आहे. पण, दुकानं किंवा मॉलमध्ये जाण्यासाठी अशा प्रकारची कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही. इस्रायलमध्ये जगाच्या तुलनेत सर्वाधिक लसीकरण झालेलं असलं तरी अजूनही कोव्हिडसंदर्भात युद्धजन्य परिस्थिती कायम आहे, असं देशातील कोव्हिड प्रतिबंधनाचं काम करणाऱ्या पथकाने सांगितले आहे.
दरम्यान आता ऑस्ट्रेलियात देखील कोरोनाचा डेल्टा विषाणू थैमान घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच भीतीमुळे सध्या ऑस्ट्रेलियातील सिडनी, मेलबर्न, कॅनबेरा आणि डार्विन या चारही प्रमुख शहरात कडक निर्बंधांसह लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- आम्हाला ब्रह्मज्ञान अन् त्यांच्यासाठी कोरडे पाषाण; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव – प्रशांत जगताप
- ‘उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघालेत’, नारायण राणेंची टीका
- ‘उद्धव ठाकरे आडमार्गाने येऊन सत्तेत बसलेत; आता त्यांचे कमी दिवस उरलेत’
- मोदींची मूर्ती हटवली! ‘आता समस्या कोण दूर करणार, नवसाला कोण पावणार?’ राष्ट्रवादीचा आंदोलनाद्वारे सवाल


