🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर अटक केली आहे. नवाब मलिकांना ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर आता भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. तसेच भाजप नेत्यानी आता नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.
नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर आता त्यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्यभरात भाजपने जोरदार आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, नवाब मलिक अटक प्रकरणी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी मंत्रालय जवळ गांधी पुतळा येथे निषेध आंदोलन केले आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, दोघे गेले, अजून दहा जण रांगेत आहेत, असं म्हणलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. एकूण बारा जण लाईनमध्ये आहेत. मला सकाळी एका पत्रकारानं विचारलं, आता कुणाची बारी आहे? त्याला मी म्हणालो, आता चिट्ठी काढावी लागेल. आतापर्यंत दोन गेले. दहांवरची चौकशी आणि तपास सुरु आहे. माझी वक्तव्य भविष्यवाणी नाहीये, असं किरीट सोमय्या पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
