मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे. नवाब मलिक यांना ३ मार्च पर्यंत ईडीची कस्टडी मिळाली आहे. या मुद्द्यावरून आता विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच आता नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी मंत्रालय येथे गांधी पुतळ्याजवळ निषेध आंदोलन सुरू केले आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिक यांच्या अटके संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारकडे न्याय मागणार अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: आयपीएलसाठी मैदानाची निवड झाली; ‘या’ मैदानांवर खेळवले जाणार सामने
‘नवाब मलिक यांना झालेल्या अटकेत काही तथ्य नाही’ – जयंत पाटील
काय सांगता! ट्विटरवर धोनी , कोहली आणि रोहितच्या नावापुढे बकरीचे चिन्ह आल्याने चाहते आनंदित
“बांगलादेशातून मुली आणून मुंबईत वेश्याव्यवसाय…”; भाजप नेत्याचा नवाब मलिकांवर गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

