Share

कॅसिनोने विना परवानगी फोटो वापरल्याने सचिन तेंडुलकर केस करणार ; ट्विट करत दिली माहिती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सचिन तेंडुलकर भारतातील नव्हे तर जागतिक पातळीवरही मोठे नाव आहे. त्याचे करोडो चाहते आहेत. त्यामुळेच त्याला अनेक मोठ्या जाहिराती सुध्या मिळतात. मात्र अशात त्याने एक जाहिरात केलीये ज्या बद्दल त्याला स्वतःला माहिती नव्हते. त्याने याबाबत खुलासा करताना सांगितले की, सोशल मीडियावर स्वत:ची जाहिरात करण्यासाठी एका कॅसिनोने त्याचे मॉर्फ फोटो वापरले. आणि आता सचिन तेंडुलकर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे.

गोव्यातील ‘बिग डॅडी’ कॅसिनोच्या प्रचारासाठी सचिनचे मॉर्फड फोटो वापरण्यात आले आहे. सचिनने ट्विट करून याची सूचना दिली आहे. त्याने लिहले “माझ्या निदर्शनास आले आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक जाहिराती दाखवल्या जात आहेत, ज्यामध्ये मी कॅसिनोचा प्रचार करत आहे. माझे फोटो मॉर्फड फोटो वापरले गेले आहेत.माझी कायदेशीर टीम आवश्यक कारवाई करत असताना, मला वाटले की ही माहिती सर्वांसोबत शेअर करणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे,”

आपल्या नावावर असंख्य विक्रम असलेल्या सचिन तेंडुलकरने सांगितले की लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्याचे फोटो वापरल्या जात असल्याचे पाहून दुःख झाले. तसेच त्याने कोणत्याही चुकीच्या गोष्टीची जाहिरात करू शकत नाही असेही या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे. “मी कधीच जुगार, तंबाखू किंवा दारूचे समर्थन केले नाही, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, अथवा वैयक्तिक क्षमतेने. माझ्या फोटो लोकांची दिशाभूल करण्यासाठी वापरली जात आहेत हे पाहून दुःख होतंय.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!