Share

एसटीचा प्रवास महागला; तिकीट दरात 18 टक्क्यांनी वाढ

Published On: 

मुंबई : डिझेलचे वाढते दर तसेच एसटी कामगारांची नुकतीच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली असून, हा खर्च भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीटदरात येत्या 15 जूनपासून 18 टक्के इतकी भाडेवाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

इंधनाच्या दरवाढीमुळे महामंडळाचा दरवर्षी साधारण 460 कोटी रुपये इतका खर्च वाढला आहे. तसेच कामगारांसाठी नुकतीच 4,849 कोटी रुपयांची वेतनवाढ करण्यात आली आहे. यामुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. त्यामुळे तिकीटदरात 30 टक्के इतकी वाढ करावी, असे महामंडळाने प्रस्तावित केले होते.

मात्र प्रवाशांवर जास्त आर्थिक भार पडू नये यासाठी ही दरवाढ 30 टक्क्यांऐवजी फक्त 18 टक्के इतका करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान राज्य सरकारनं डिझेलवर करमाफी केल्यास एसटीचे तिकीट दर कमी करणार असल्याचं देखील महामंडळाच्या वतीन सांगण्यात आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!