Share

‘हा व्यवस्थेचा दोष आहे का?’, विद्यार्थी आत्महत्यांवर राष्ट्रवादीच्या नेत्याकडून चिंता व्यक्त

Published On: 

बीड : देशभरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अभ्यासाचा ताण, परिक्षेत कमी मार्क मिळणे, पालक रागावणे यासारख्या क्षुल्लक कारणांमुळे अनेक मुले विद्यार्थी दशेतच आपले जीवन संपवत आहेत. बीडच्या गेवराई तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांनी अशाच कारणांमुळे मृत्युला कवटाळत आपले जीवनयात्रा संपवली. यापूर्वी शहरात, मेट्रो सिटीमध्ये विद्यार्थी आत्महत्येच्या घटना घडत असत. मात्र, हे लोण आता ग्रामीण भागात देखील पोहोचले आहे.  याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमरसिंह पंडित यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आहे. ”बारा.. तेरा..पंधरा वर्षाची पोरं हे आत्महत्येच्या मार्गाने जात असतील तर हा व्यवस्थेचा दोष आहे का? हा प्रश्न राज्यकर्त्यांना पडल्याशिवाय राहणार नाही” असे त्यांनी म्हंटलय. अमरसिंह पंडित यांनी काय मत व्यक्त केले आहे, वाचा त्यांच्याच शब्दांत..

”गेवराई तालुक्यातील मौजे धोंडराई येथील पंधरा वर्षीय आदित्य गुंजाळ या मुलाने जानेवारीच्या तीन तारखेला आत्महत्या केली. आदित्याचे वडील श्री. बदाम गुंजाळ हे मुंबई येथे ड्रायव्हर म्हणून काम करतात. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत दहावीत शिकणा-या आदित्याने आत्महत्या केली म्हणून गुंजाळ परिवाराला भेटण्यासाठी धोंडराईला गेलो. पंधरा वर्षाच्या आदित्याने दोर लावून फास घ्यावा, याचं नेमकं कारण कळू शकले नाही. तळण्याच्यावाडीच्या शिवारात शेतात काम करणाऱ्या आपल्या आईला आदित्य पिण्याचे पाणी देऊन घरी आला आणि राहत्या घराचा दरवाजा बंद करून फास घेतला. माझ्यासमोर उपस्थित असणाऱ्या त्याच्या सर्व नातेवाईकांशी चौकशी केली परंतु आदित्याने केलेल्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

आज डॉ. जगदीश फुलझळके यांचा मुलगा सार्थक जगदीश फुलझळके याने दिनांक दहा फेब्रुवारी रोजी आत्महत्या केल्याची बातमी कळाली म्हणून मी डॉ. जगदीश फुलझळके यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. सार्थकचे वय चौदा. सेन्ट अँन्स स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणारा सार्थक याने मागच्या महिन्यात आदित्याने निवडलेल्या मार्गावर जाण्याचे कारण काय ? हा खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारा प्रश्न आहे. याला व्यवस्थेचा दोष म्हणायचा का ? बारा पंधरा वर्षाची मुलं ही हळवी असतात, मान्य. परंतु कसलाही विचार न करता इतक्या टोकाला जाऊ शकतात हा Civil society साठी Wake Up Call तर नाही ?

अलीकडच्या काळात शेतकरी आत्महत्या करत असल्याचे वर्तमानपत्रात ऐकायला मिळाले. शेतीचे कर्ज, अतिवृष्टीत आलेले पीक हातचे जाणे, अशा अनेक कारणाने त्रस्त झालेला बळीराजा या मार्गाने जातो हे आजपर्यंत पाहत आलो. परंतु बारा.. तेरा..पंधरा वर्षाची पोरं हे आत्महत्येच्या मार्गाने जात असतील तर हा व्यवस्थेचा दोष आहे का ? हा प्रश्न राज्यकर्त्यांना पडल्याशिवाय राहणार नाही….या सर्व घटना पाहता मन मात्र विषण्ण होत आहे…”

अशा भावना पंडित यांनी व्यक्त केल्यात. अमरसिंह पंडित हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत. बीड जिल्ह्यात त्यांचे मोठे प्रस्थ आहे. अभ्यासू नेते असलेले पंडित यांनी सामाजिक विषयांवर त्यांनी विधिमंडळात अनेकदा आवाज उपस्थित केला आहे. मराठवाड्यातील पाणी प्रश्न, हॉटेल-ढाब्यांना देण्यात आलेली महापुरुष वा त्यांच्या संबधित वास्तुंची नावे यासांरख्या महत्त्वाच्या मुद्द्यांना त्यांनी हात घातला आहे. आता विधिमंडळात नसले तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी आत्महत्येसारखा मुद्दा त्यांनी उजेडात आणला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!