Share

IPL 2022: मुंबईने सामना गमावला; मात्र इशान किशनने अर्धशतक करत केली सचिनची बरोबरी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल २०२२चा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला आहे.अक्षर पटेल आणि ललित यादवच्या यांच्या खेळीने दिल्लीने मुंबईला ४ विकेट्सने पराभूत केले. तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू इशान किशनने फलंदाजी करताना मुंबईसाठी नाबाद ८८ धावा केल्या. मुंबईने सामना जरी गमावला असला तरी या सामन्यात अर्धशतक ठोकून किशनने सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

IPL 2022 च्या मेगा ऑक्शन स्टार इशान किशनने (Ishan kishan) मुंबई इंडियन्ससाठी सामना उघडला. इशान किशनने दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्यात झंझावाती अर्धशतक झळकावून इतिहास रचला. त्याने मुंबई इंडियन्सकडून (MI) नाबाद खेळी खेळताना सचिन तेंडुलकर आणि क्विंटन डी कॉक यांच्या विशेष विक्रमाची बरोबरी केली. तो आयपीएलमध्ये सलग तीन अर्धशतके झळकावणारा मुंबई इंडियन्सचा तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याने यापूर्वी आयपीएल २०२१ च्या शेवटच्या दोन साखळी सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाबाद ५० आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ८४ धावा केल्या होत्या. याआधी मुंबईसाठी सचिन तेंडुलकर(Sachin tendulkar) आणि क्विंटन डी कॉक यांनी ही कामगिरी केली होती.

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. मुंबई इंडियन्सकडून सलामीला आलेल्या इशान किशनने ४८ चेंडूंचा सामना करत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ८१ धावा केल्या. मुंबईच्या १७७ चा पाठलाग करताना दिल्लीने शेवटच्या षटकात धावा पूर्ण केल्या. ज्यामुळे मुंबईला त्यांचा पहिला सामना गमवावा लागला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!