मुंबई : केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले आज मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी विधिमंडळ परिसरात भेट दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ते राजकीय परिस्थिती आणि मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा करणार होते. मात्र, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा झाली नाही. तरीही, महायुतीमध्ये रिपाई पक्षही सोबत आहे, त्यामुळे रिपाईला मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळावे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
हा उत्तर प्रदेश किंवा बिहार नाही, हे महाराष्ट्र आहे. नितीमत्तेवर येथील राजकारण चालत असते, विधानसभेत दादागिरी करुन राजकारण चालत नसतं. पायऱ्यावर दररोज बसणं योग्य नाही. जर पायऱ्यावर बसायचं असेल तर विधानसभेत येऊ नका. पायऱ्यावर बसून रस्ता अडवायचा असल्यास, इतरांची गैरसोय करता कामा नये, असंही आठवले शेवटी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Uday Samant | आज पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्यांपैकी 15 जण शिंदे गटात येणार; उदय सामंतांचा दावा
- Assembly Session 2022 | मी काय गोट्या खेळतोय का?; सुहास कांदे विरोधकांवर संतापले
- Mahesh Shinde vs Amol Mitkari | विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील धक्काबुक्कीनंतर महेश शिंदे-अमोल मिटकरींचे आरोप-प्रत्यारोप
- Suhas Kande । “अहो फडणवीस साहेब, तुमच्याकडे बघून आम्ही इकडं आलोय”; कांदेंची आक्रमक भूमिका
- CM Eknath Shinde | राज्यातील नदीपात्रातील गाळ काढण्यासंदर्भात धोरण ठरवणार – एकनाथ शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

