Share

Assembly Session 2022 | मी काय गोट्या खेळतोय का?; सुहास कांदे विरोधकांवर संतापले

Published On: 

🕒 1 min read

Suhas Kande । मुंबई : गेल्या चार दिवसांप्रमाणे आजचा दिवस देखील वादळी ठरला आहे. आज सभागृहात पुढे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले, पण तरीही कांदे आक्रमक होते. यावेळी त्यांनी थेट अहो फडणवीस साहेब, तुमच्याकडे बघून आम्ही इकडं आलोय, असे विधान कांदे यांनी केले. कांदेंचे हे विधान सध्या चर्चेत आले आहे.

काही महिन्यांपूर्वीच भुजबळांविरोधात सुहास कांदे यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडेही तक्रार केली होती. पण तेव्हा ती फाईल बंद करू भुजबळांना क्लिन चिट देण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद हे सर्वश्रुत आहे. त्यांनी आज माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात कथित भ्रष्टाचारासंदर्भात त्यांनी काही प्रश्न विचारले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिले. पण सुहास कांदे यावेळी नाराज झाले. फडणवीसाच्या उत्तरानंतरही कांदे आक्रमकच दिसत होते.

यावेळी बोलत असताना ते म्हणाले कि, न्यायाविधी विभागाने ३१ मे २०२२ रोजी न्यायविधी विभागाने पत्र काढले कि उच्च न्यायालयात जाण्याची गरज नाही. आदरणीय देवेंद्र फडणवीस असं काय प्रेम उफाळून आलं कि, ११६० कोटी घोटाळ्याप्रकरणी अपिलात नाही जायचं हे जर निर्दोष आहेत. यांना माहित आहे आम्ही घोटाळाच केलेला नाही. तर सरकार अपिलात एवढं बोलताच सभागृहात गोंधळ सुरु झाला. यावर कांदे भडकले म्हणाले. म्हणाले आरे प्रश्नच विचारतोय काय गोट्या खेळतोय काय, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!