🕒 1 min read
Suhas Kande । मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे, राज्यात घडलेल्या सत्तापालटामुळे यंदाचे हे अधिवेशन वादळी ठरत आहे. आज सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय लाजिरवाना प्रकार घडला आहे. विरोधी पक्षनेते आमने सामने आले. धक्काबुकीचा प्रकार घडला. यानंतर सभागृहात पुढे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले, पण तरीही कांदे आक्रमक होते.
यावेळी त्यांनी थेट अहो फडणवीस साहेब, तुमच्याकडे बघून आम्ही इकडं आलोय, असे विधान कांदे यांनी केले. कांदेंचे हे विधान सध्या चर्चेत आले आहे. त्यामुळे राज्यातले राजकारण पुन्हा ढवळून निघाले आहे. त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे. काही महिन्यांपूर्वीच भुजबळांविरोधात सुहास कांदे यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडेही तक्रार केली होती. पण तेव्हा ती फाईल बंद करू भुजबळांना क्लिन चिट देण्यात आली होती. मात्र राज्यात आता सत्तापालट झाले असून एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले.
शिंदे गटात आमदार सुहास कांदे देखील आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद हे सर्वश्रुत आहेच त्यांनी आज माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात कथित भ्रष्टाचारासंदर्भात त्यांनी काही प्रश्न विचारले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिले. पण सुहास कांदे यावेळी नाराज झाले. फडणवीसाच्या उत्तरानंतरही कांदे आक्रमकच दिसत होते.
दरम्यान, भ्रष्टाचार झाला असेल तर कुणालाही पाठीशी घातले जाणार नाहीत. देशाचे सॉलिसिटर जनरल यांचेही मत यामध्ये घेऊ. त्यांनी जर असे म्हटले की अपिलात गेले पाहिजे, तर आपण नक्की जाऊ. आपल्या मताची मी गंभीर नोंद घेतली आहे. सॉलिसिटर जनरल यांचेही मत यामध्ये घेतले जाईल, उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पण या उत्तराने आमदार कांदेंचे समाधान झाले नाही आणि ते संतापले.
महत्वाच्या बातम्या :
- CM Eknath Shinde | राज्यातील नदीपात्रातील गाळ काढण्यासंदर्भात धोरण ठरवणार – एकनाथ शिंदे
- Police Recruitment | राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती ; देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- Supriya Sule । राष्ट्रवादीच्या आमदारांना झेड प्लस सुरक्षा पुरवावी; सुप्रिया सुळेंची थेट अमित शहांकडे मागणी
- Ajit Pawar | ५० खोके, एकदम ओके ही घोषणा शिंदे गटाच्या जिव्हारी लागली – अजित पवार
- Eknath Khadse । एकमेकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे योग्य नाही; अधिवेशनातील राड्यावर खडसेंची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
