मुंबई : भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी आज मुंबईतील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर घणाघात केला आहे. यावेळी त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर देखील भाष्य केलं. तर, महाविकास आघाडी सरकारने टीव्हीवर सुरु केलेल्या जाहिरातबाजीवर देखील त्यांनी टीका केली आहे.
‘राज्याचा अर्थसंकल्प हा फक्त पुणे केंद्रीत महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक अर्थसंकल्प आहे. टिव्हीवर सुरू असणाऱ्या जाहिराती बघा, या जाहिराती बघून लोक शिव्या घालत आहेत’ अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
पुढे त्यांनी अर्थसंकल्पावर देखील टीका केली आहे. ‘राज्याचा अर्थसंकल्प हा फक्त पुणे केंद्रीत महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक अर्थसंकल्प आहे. राज्याच्या उत्पन्नात प्रचंड मोठी तुट आहे. अजूनही कोरोना संपलेला नाही. अजूनही उत्पन्न कमीच येणार असं वाटत असताना अर्थसंकल्पात दावा केला एवढे पैसे कोठून येणार आहेत? दीड लाख कोटी उत्पन्न कमी असताना एवढ्या गोष्टींसाठी पैसे कुठून आणणार? सरकारने फक्त घोषणा केल्यात, एकही तरतूद केलेली नाही.’ असं भाष्य नारायण राणे यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वाईफसाठी परेशान जाधव म्हणतात ‘अ ब्युटीफुल लाईफ !’
- वडोदबाजार येथील आठवडी बाजार बंद
- परभणीत नागरी भागामध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत संचारबंदी
- एसटी महामंडळाच्या बसेस आता गंगापूरलाही थांबणार
- महत्त्वाच्या कामांसाठी शेतकऱ्यांचे पशुवैद्यकीय दवाखान्यात हेलपाटे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

