Share

NCP । श्रीकांत शिंदे बसले मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर? राष्ट्रवादीकडून ‘तो’ फोटो ट्विट

Published On: 

मुंबई : राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील कलगीतुरा दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. अशातच त्यांच्या गैरहजेरीत एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत विराजमान झाल्याचे दिसत आहेत. यावरुन आता विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक फोटो ट्वीट करण्यात आला असून त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे.

काय आहे आरोप?

रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो ट्विट केला आहे. हा फोटो ट्विट करत त्यांनी म्हटलं आहे की, ‘खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूये. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?’ अशी टीका वरपे यांनी केली आहे.

पुढे वरपे म्हणाले कि, कदाचित राज्याचे मुख्यमंत्री गणपती मंडळ, नवरात्र उत्सव, पितृपक्ष किंवा दिल्ली वाऱ्यांमध्ये व्यग्र असल्यामुळे राज्यातील इतर लोकांचं काम पाहण्याची जबाबदारी सुपर सीएम म्हणून श्रीकांत शिंदेंकडे दिली आहे, असं आम्हाला वाटतं. राज्याचा कारभार नेमका कोण पाहतंय? हे राज्य अधांतरी आहे असंच वाटतंय. ज्याला जे वाटतंय, तो ते करतोय”, असंही ते म्हणाले.

दरम्यान, श्रीकांत शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांचे खुर्चीत बसले असतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. यावरुन अनेकजण राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत. हे छायाचित्र वर्षा बंगल्यावरच टिपण्यात आलेले आहे किंवा नाही, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा होऊ शकलेला नाही. मात्र, फोटो व्हायरल होताच विरोधकांनी शिंदेंना धारेवर धरलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!