Share

‘सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना?’, देशमुखांच्या अटकेनंतर राम कदमांची प्रतिक्रिया

Published On: 

पुणे : १०० कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अखेर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आले आहे. १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात ट्विट करत कदम म्हणाले की,’पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता दर महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीमध्ये त्यांचे प्रमुख बॉस कोण आहेत? वसुलीचे हिस्सेदार, वाटेकरी, कोण कोण नेते आणि पक्ष आहेत, हे समोर येईल. अन अर्थातच त्या बड्या नेत्यांनाही जेलमध्ये जावे लागेलच. ही लढाई कोणा एका व्यक्ति विशेषच्या विरोधातील नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. कल्पना करा. महिन्याला एका खात्यात फक्त मुंबईतून १०० कोटी तर संपूर्ण महाराष्ट्रात किती? अन सर्व खाती मोजली तर किती कोटी? हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना?.’

दरम्यान, १०० कोटी वसुलीप्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना ४ ते ५ वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर काल(१ नोव्हें.)अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ईडीचे वरीष्ट आधिकारी दिल्लीतून मुंबईत दाखल झाले. त्यांनी देशमुखांची चौकशी केली आणि अखेर १३ तासांनंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!