🕒 1 min read
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह व तत्कालीन एपीआय सचिन वाझे यांनी खंडणी वसूलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख फरार झाले होते. आता ते ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असून ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत.यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ ट्विट करत त्यांची बाजू मांडली असून मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि अँटेलिया स्फोटक प्रकरणातील आरोपी सचिन वाझेवर गंभीर आरोपही केले आहेत. तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला आहे.
देशमुख म्हणाले की,’परमबीर सिंह यांचा सहकारी एपीआय सचिन वाझे त्याने सुद्धा परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. आज सचिन वाझे खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. वाझे याआधी देखील अनेकदा तुरुंगात होता. मी गृहमंत्री असताना सचिन वाझेला सरकारी नोकरीतून काढण्याची प्रक्रिया चालू केली. त्याला सरकारी नोकरीतून काढल्यावर त्यानं माझ्यावर आरोप केले.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’परमबीर सिंह आणि सचिन वाझेसारख्यांच्या आरोपांवर माझी चौकशी होत आहे. माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे. त्याबद्दल मला अतिशय दुःख आहे. मी सरळ मार्गाने, नैतिकतेला धरून चालणारा व्यक्ती आहे. ३० वर्षांच्या सामाजिक-राजकीय जीवनात माझ्यावर एकही आरोप झाला नाही. पण जो माझ्यावर आरोप करून देश सोडून पळून गेला आणि सचिन वाझे जो अनेकदा तुरुंगात गेला, आज खुनाच्या आरोपात तुरुंगात आहे त्यांच्या आरोपावरून माझी ईडी, सीबीआय चौकशी सुरू आहे, ही दुःखाची गोष्ट आहे,’ असेही यावेळी देशमुख म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- मलिकांनी लवंगी फटाका लावलाय, आता दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडणार- देवेंद्र फडणवीस
- ‘राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा खेळ सुरु’; नवाब मलिकांचा गंभीर आरोप
- ‘नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, लवकरच शरद पवारांना पुरावे देणार’, फडणवीसांचा गंभीर आरोप
- ‘चोराच्या उलट्या बोंबा; विनाशकाले विपरीत बुद्धी’, अमृता फडणवीसांचे मलिकांना प्रत्युत्तर
- जास्त बोललात तर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन तुरुंगात टाकू- नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
