मुंबई – शिवसेनेनं भाजपाला मुक्ताईनगरमध्ये राजकीय धक्का दिला असून भाजपाच्या विद्यमान सात आणि तीन माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलं. मुक्ताईनगर नगरपंचायतीमधील भाजपच्या सहा नगरसेवकांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
या राजकीय घडामोडीला २४ तास लोटत नाही, तोच भाजपाने शिवसेनेला जोरदार दणका दिला आहे.भाजपाने माथेरानमध्ये शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिवसेनेच्या १४ नगरसेवकांपैकी १० नगरसेवकांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यात उपनगराध्यक्षांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कोल्हापूर येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला.
आकाश चौधरी (उपनगराध्यक्ष), राकेश चौधरी (नगरसेवक), सोनम दाबेकर (नगरसेवक), प्रतिभा घावरे (नगरसेवक), सुषमा जाधव (नगरसेवक), प्रियांका कदम (नगरसेवक), ज्योती सोनवळे (नगरसेवक), संदीप कदम (नगरसेवक), चंद्रकांत जाधव (नगरसेवक), रुपाली आखाडे (नगरसेवक) यांनी भाजपात प्रवेश केला.
शिवसेनेच्या दहा नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्यात भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. ठाकूर यांची कार्यशैली व नेतृत्व भावल्यामुळं भाजपमध्ये प्रवेश केल्याचं या नगरसेवकांचं म्हणणं आहे. शिवसेनेनं कालच जळगावच्या मुक्ताईनगरात भाजपला धक्का दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- महुआ मोईत्रा यांनी बाबा रामदेव यांना झापलं, म्हणाल्या… ‘तुमचा बाप आणि भाऊ, तर…’
- ‘अवघ्या 10 मिनिटांच्या या भेटीत मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा कशी काय होऊ शकते?’
- ‘शरद पवार यांचा सरकारला पूर्णपणे आशीर्वाद असून हे सरकार पाच वर्षे चालेल’
- २०१५ मध्ये प्रधानसेवकांनी केलेल्या वक्तव्याची नवाब मलिक यांनी करुन दिली आठवण, म्हणाले…
- लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीच्या घोळात अडकली का? भाजपाचा राज्य सरकारला सवाल


