Share

भाजपच्या खासदाराचे कोरोनामुळे निधन; नरेंद्र मोदींनी केले तीव्र दुखः व्यक्त

Published On: 

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसात कोरोनाने डोके पुन्हा वर काढल्याचे दिसून येत आहेत.मोठ्या प्रमाणावर पुन्हा रुग्ण सापडू लागले असून अनेक राजकीय नेते देखील या विषाणूच्या विळख्यात अडकत आहेत. यातच भाजपचे खासदार नंदकुमारसिंह चौहान यांना देखील कोरोनाची लागण झाली होती आज चौहान यांचे निधन झाले.

चौहान यांच्यावर दिल्लीतील ‘मेदांता’ रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याचवेळी ते कोरोना संक्रमित झाले होते. सोमवारी रात्री उशिरा त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते मध्य प्रदेशातील खंडवा येथील लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.

दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदकुमारसिंह चौहान यांच्या निधनाबद्दल तीव्र दुखः व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘खंडवाचे लोकसभा खासदार नंदकुमारसिंह चौहान जी यांच्या निधनामुळे मी दु: खी आहे. संसदीय कार्यवाही, संघटनात्मक कौशल्य आणि मध्य प्रदेशात भाजपाला बळकटी देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांचे स्मरण केले जाईल.

दरम्यान,कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.देशात कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून यामध्ये 60 वर्षावरील नागरिकांना आणि ज्यांना गंभीर आजार आहे अशा 45 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे.

दरम्यान,या टप्प्याला सोमवार एक मार्चपासून सुरुवात झाली असून या एकाच दिवशी तब्बल 25 लाख लोकांनी लसीकरणासाठी नोंद केल्याचं पहायला मिळतंय.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!