मुंबई : मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामाचं आयोजन सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं होतं. कोरोनाच सावट लक्षात घेता १३ वे हंगाम युएईमधील देशांमध्ये करण्यात आलं होतं. या सत्राचं विजेतेपद मुंबई इंडियन्स या संघाने पटकावलं.
नुकतेच आयपीएलच्या १४ व्या हंगामाचे बिगुल वाजले आहेत. बुधवारी (२० जानेवारी) सर्व आयपीएल फ्रँचायझींनी आयपीएल २०२१ च्या हंगामाच्या लिलावाआधी संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या त्याचबरोबर आता गौतम गंभीरने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली यांच्यात नेहमीच शीतयुद्ध सुरू असते. या दोघांमध्ये बर्याचदा वाद झालेले पाहायला मिळाले आहेत. कित्येकदा पाहिले गेले आहे की, गौतम गंभीरने विराट कोहलीवर निशाना साधलेला आहे. यावेळेस सुद्धा असे काहीसे घडले आहे.
यंदा आयपीएलचा चौदावा हंगाम सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने विराट कोहलीवर निशाना साधला आहे. गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला,’आठ वर्षापासून एकही किताब जिंकला नाही. हा खूप मोठा कालावधी आहे. मला सांगा असा कोणता कर्णधार आहे. कर्णधाराला सोडा. कोणत्या खेळाडूचे नाव सांगा, जो 8 वर्षात एक ही किताब न जिंकता खेळत आहे. गौतम गंभीर म्हणाला, ‘मला कोहलीच्या विरुद्ध काही बोलायचे नाही. परंतु कोहलीने पुढे येऊन म्हणायला हवे की, मी यासाठी जबाबदार आहे.’
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांनी केलेल्या समजुतीच्या प्रयत्नानंतर देखील अण्णांचा बाणा कायम !
- शेतकरी नेत्यांना चर्चेत रस नाही; कृषिमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
- ‘थोरातच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी राहिले तर काँग्रेस स्वबळावर सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही’
- सिनेमातील ‘नायक’ सत्यातील ‘सृष्टी गोस्वामी’; एक दिवसाची मुख्यमंत्री बनण्याचा मान विद्यार्थिनीला !
- मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
