ऑस्ट्रेलिया : ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. हा विजय भारतीय संघासाठी ऐतिहासिक विजय ठरला.
या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया मायदेशी परतलेली आहे. त्याने ऑस्ट्रेलियातून माघारी येत असताना ऑस्ट्रेलिया मालिकेत झालेल्या सर्व आठवणी पुन्हा एकदा जाग्या केल्या. भारतीय संघाचा फिरकीपटू अश्विन आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर चर्चा करत असलेले एका व्हिडिओत दिसत आहे. या दरम्यान अश्विनने मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांची नक्कल करताना मेलबर्न येथे दुसर्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथला कसे बाद करायचे ठरवले होते, त्या योजनेचा खुलासा केला आहे.
अश्विनने हा सर्व घटनाक्रम आठवून क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर सांगितला. या व्हिडिओत अश्विन बोलताना दिसत आहे की, “आपण नाणेफेक हरल्यानंतर रवि शास्त्री माझ्याकडे आले आणि म्हणाले ‘ऍश’. मी तेव्हा पँट घालत होतो आणि अचानक मागे वळून पाहिले. मी म्हणालो हो, रवि भाई. यावर त्यांनी आपल्या अंदाजात सांगितले, ‘सुरुवातीच्या 10 षटकांत चेंडू घ्यायचा.’तेव्हा मी विचार करू लागलो की, मेलबर्न येथे पहिल्या 10 षटकात गोलंदाजी? ते म्हणाले, ‘मी जिंक्सला सांगितले आहे. यावर चेंडू फिरकी घेवू शकतो. ” अश्विन पुढे म्हणाला, ‘मी रवि शास्त्री यांच्या सांगण्यावरून लगेच चेंडू घेतला आणि चेंडूृसुद्धा लगेच फिरकी घेवू लागला.’
ASHHHHHHHHHHH. GET THE BALL IN THE FIRST TEN OVERS ????????@RaviShastriOfc MASTERSTROKE AT THE 'G pic.twitter.com/9j92nY5H7A
— @ravimaestri (@ravimaestri) January 21, 2021
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांनी केलेल्या समजुतीच्या प्रयत्नानंतर देखील अण्णांचा बाणा कायम !
- शेतकरी नेत्यांना चर्चेत रस नाही; कृषिमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
- ‘थोरातच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी राहिले तर काँग्रेस स्वबळावर सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही’
- सिनेमातील ‘नायक’ सत्यातील ‘सृष्टी गोस्वामी’; एक दिवसाची मुख्यमंत्री बनण्याचा मान विद्यार्थिनीला !
- मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या – रामदास आठवले


