Share

ओबीसींमध्ये नवा प्रवर्ग निर्माण करणे शक्य आहे का? ठाकरे, पवार, फडणवीस, चव्हाणांनी सांगावं

Published On: 

मुंबई: राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. याच मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी राज्यातील महत्वाच्या नेत्यांसोबत भेटीगाठी घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संभाजी छत्रपती यांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच मराठा आरक्षण टिकवण्यासाठी पर्यायही सांगितले. यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या ओबीसी प्रवर्गातील समावेशाबाबत देखील भाष्य केलं.

मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची अनेकांनी मागणी अनेक मराठा नेत्यांनी मागणी केली आहे. त्यांची ही भूमिका असू शकते. पण ओबीसींमध्ये नवे प्रवर्ग करणे शक्य शक्य आहे का? हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनीच सांगावं, असं आवाहन खासदार संभाजी छत्रपती यांनी केलं.

नेमकं काय म्हणाले संभाजीराजे ?

“अनेक लोकांची इच्छा आहे की आपण ओबीसीमध्ये जावं. त्यासाठी सगळ्यांना आपापलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर नेहमी हा विषय मांडतात. ओबीसी नेते हरिभाऊ राठोड देखील हा विषय मांडतात. पण ओबीसींमध्ये नवा प्रवर्ग निर्माण करून देता येऊ शकतो का? हे मी नाही सांगणार. सरकारने सांगायचं, उद्धवजींनी सांगायचं, पूर्वीच्या सरकारने सांगावं, देवेंद्र फडणवीसांनी सांगावं. सगळं आम्हीच सांगायचं का? तुम्ही भूमिका स्पष्ट करा ना”, असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!