Share

‘काहीही करा, शुल्क भरणारच नाही’, व्यापाऱ्यांचा मनपाला इशारा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरातील व्यापारी आधीच व्यवसायिक कर भरतात. त्यात आता परवाना शुल्काची भर कशासाठी? व्यापारी वर्ग कोणत्याही परिस्थितीत हा शुल्क भरणार नाही अशी भूमिका आता व्यापारी वर्गाने घेतली आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी जसे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची दखल घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. त्याप्रमाणे व्यापारी वर्गाचे प्रश्न देखील त्यांनी सोडवावे परवाना शुल्क घेऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे. या मागणी करण्यासाठी लोकनेत्यांना भेटणार असल्याचे औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले.

१ एप्रिलपासून शहरातील व्यापार्‍यांना व्यवसाय परवाना शुल्क लागू करण्याच्या निर्णय महापालिकेने घेतला आहे. आगामी दोन दिवसांत यास अंतिम मंजुरी मिळणार आहे. मात्र व्यापाऱ्यांनी यास विरोध दर्शविला आहे. व्यापारी वर्गाला आधीच कर लावले जात आहेत. सर्व व्यापारी वर्ग व्यवसायिक कर भरतात.

त्यात आता परवाना कर लावणार असेल तर व्यापारी वर्गाला याचा त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे परवाना शुल्क भरण्यास जिल्हा व्यापारी महासंघाकडून तीव्र विरोध दर्शविला जात असून परवाना शुल्क आम्ही भरणारच नाही. अशी भूमिका व्यापारी वर्गाने घेतली आहे.

इतकेच नव्हे तर परवाना शुल्क आकारू नये यासाठी मनपाकडे व्यापारी वर्ग विनंती करणार आहे. याशिवाय शहरातील सर्व पक्षीय लोकनेत्यांची भेट घेऊन परवाना शुल्क आकारू नये यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी व्यापारी वर्ग करणार आहेत. लोकप्रतिनिधी ज्या प्रमाणे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात त्याप्रमाणे व्यापारी वर्गाचे देखील प्रश्न त्यांनी सोडवावे अशी अपेक्षा आहे.

त्यामुळे परवाना शुल्क न भरण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने लोकप्रतिनिधींना करणार आहे. असे महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले. तसेच आम्ही कर भरणारच नाही, परवाना शुल्कला पूर्णतः विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!