मुंबई : भारत आणि आयर्लंड (IRE vs IND) यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी खेळवला जाणार आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघ मैदानात उतरेल तेव्हा त्यांचा एकच इरादा असेल, तो म्हणजे विरोधी संघाला हरवून मालिका जिंकणे. त्याचबरोबर यजमान संघाला या सामन्यात भारताला हरवून मालिका १-१अशी बरोबरीत सोडवायची आहे.
भारत आणि आयर्लंड यांच्यातील मालिकेतील दुसरा टी-२० सामना डब्लिन येथील द व्हिलेज क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. ३२ वर्षीय अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा त्याच्याकडे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक, दोन नव्हे तर पाच खेळाडूंना मागे टाकण्याची सुवर्णसंधी असेल.
भुवनेश्वरने भारतीय संघासाठी आतापर्यंत ६५ टी-२० सामने खेळले असून, ६५ बळी घेतले आहेत. जर त्याने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात आणखी तीन बळी घेतले, तर तो इंग्लिश वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड, माजी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकरा, किवी फिरकीपटू मिचेल सँटनर, श्रीलंकेचा माजी फिरकीपटू अजंथा मेंडिस आणि भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना मागे टाकेल.
स्टुअर्ट ब्रॉडने इंग्लिश संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५६ सामने खेळले असून, ५५ डावात त्याने ६५ बळी घेतले आहेत. याशिवाय नुवानने श्रीलंका संघासाठी ६६, सँटनरने ६६, मेंडिसने ६६ आणि बुमराहने ५७ टी-३० सामन्यांमध्ये ६७ बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

