🕒 1 min read
मुंबई : शिवसेना बंडखोर आमदार आणि राज्य सरकार थेट कोर्टात पोहोचले आहे. सेनेच्या १६ आमदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी शिवसेनेने उपाध्यक्षांकडे केली होती. या सर्व वादावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली आहे. महाराष्ट्रातील बंडप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावली असून केंद्राने शिंदे गट प्रकरणात भूमिका स्पष्ट करावी, असे कोर्टाने म्हटले आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने यावेळी महाराष्ट्र सरकारला ३९ आमदार, त्यांचे कुटुंबीय व मालमत्ता यांची हानी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. आता या प्रकरणी एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!”, असे ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आपले मत मांडले आहे. आजच्या सुनावणीत अनेक मुद्दे शिंदे गटाचे वकील तसेच सरकारचे वकील यांनी समोर ठेवले. तर कोर्टानेही काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करत बंडखोर आमदारांना उत्तर देण्यासाठी ५ दिवसांचा अवधी वाढवून दिला आहे.
हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!#realshivsenawins
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 27, 2022
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील 5 मोठे मुददे
१) बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची कारवाई १२ जुलैपर्यंत टळली
२) उपाध्यक्षांच्या सूचनेला उत्तर देण्यासाठी बंडखोर आमदारांना 12 जुलै सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
३) नरहरी झिरवाळ, सुनील प्रभू आणि अजय चौधरी, तसंच केंद्राला सुप्रीम कोर्टाची नोटीस, म्हणणं मांडण्याचे आदेश.
४) बंडखोर आमदार आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षणं करावे.
५) पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे.
६) तसेच ११ जुलैपर्यंत बहुमत चाचणी घेता येणार नाही, याची नोंद घ्यावी .
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
