मुंबई – येत्या 9 एप्रिलपासून आायपीएलच्या चौदाव्या सिझनला सुरुवात होत आहे. या स्पर्धेला अवघे आठ दिवस उरलेले असतानाच चेन्नई सुपरकिंग्जच्या द्चानी हळूहळू वाढू लागल्या आहेत.चेन्नईचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हेझलवूडने या वर्षी होणारा टी-२० वर्ल्ड कप आणि अॅशेस मालिकेचा विचार करुन हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. शिवाय बायो बबलमधून दूर राहून कुटुंबियांसोबत वेळ घालवायचा असल्याचं त्याने म्हटलं.
बायो बबल आणि निरनिराळ्या वेळेत क्वॉरंटाइन राहून आता १० महिने झालेत. त्यामुळे काही काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेऊन कुटुंबियांसोबत वेळ घालवायचा आहे”, असं हेझललूडने सांगितलं. दरम्यान,ऑस्ट्रेलियाचा वेस्टइंडीजचा मोठा दौरा आहे, त्यानंतर बांगलादेश दौरा, टी-२० वर्ल्ड कप आणि नंतर अॅशेस मालिका. त्यामुळे १२ महीने ऑसी खेळाडू व्यस्त असणार आहेत.
दरम्यान, चेन्नईसाठी ही चिंता वाढवणारी बातमी समोर येत असताना तिकडे राजस्थानसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वन-डे मालिकेपूर्वी जोफ्रा आर्चर इंग्लंडमध्ये परतला होता. आर्चरच्या हाताचं काही दिवसांपूर्वीच ऑपरेशन झालं आहे. त्यामुळे आर्चर यंदा आयपीएल खेळू शकणार नाही, अशी शक्यता होती.मात्र आता समोर आलेल्या वृत्तानुसार आर्चर सुरुवातीच्या काही मॅचनंतर आयपीएल स्पर्धेत खेळणार आहे. आर्चर पहिल्या चार मॅच खेळणार नाही. त्यानंतर तो निवडीसाठी उपलब्ध असेल.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएलच्या आधी चेन्नई सुपरकिंग्जला मोठा धक्का ; वेगवान गोलंदाजाची स्पर्धेतून माघार
- ठाणे जिल्हा बँकेत महाविकासआघाडीचा दारुण पराभव, बविआ-भाजपचे निर्विवाद वर्चस्व
- हम नहीं सुधरेंगे! महावितरणचा भोंगळ कारभार, वीज कनेक्शन तोडूनही आले शंभर युनिटचे बिल
- छोट्या बचत योजनांचे व्याज दर कमी करण्याचा निर्णय मागे; सर्वसामान्यांना दिलासा
- सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर


