दुबई : सुरुवातीला आयपीएल होईल की नाही याबद्दल शंका उपस्थित करण्यात येत होती कारण कोरोनामुळे परिस्थिती बिघडत चालली होती. सामने सुरू असताना प्रेक्षकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून विनाप्रेक्षक सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला यावर्षी आयपीएल भारतात होत नसून UAE असून, इंडियन प्रीमियर लीग 13 व्या सत्रात येऊन पोहचली आहे.
आयपीएलमध्ये सद्या चुरशीचं वातावरण असतानाच अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे तर काहींना वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल अर्ध्यात सोडून घरी परतावं लागलं होतं. आता गोलंदाजांचे धाबे दणाणून सोडणारा वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेल बद्दल धक्कादायक बाब समोर आली आहे. यंदाच्या मोसमात ख्रिस गेल किंग्ज इलेव्हन पंजाब संघात आहे. मात्र ७ सामने होऊन देखील ख्रिस गेलला खेळवण्यात आलेलं नाही.
पंजाबने आतापर्यंत ७ पैकी ६ सामने गमावले असून चाहते ख्रिस गेलच्या आगमनाची वाट पाहत आहेत. ख्रिस गेलला संघात का संधी मिळत नाही आहे, याचे कारण समोर आले आहे. गेलला अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी गेलला फूड पॉयझन झाल्याचे सांगितले होते. आता गेलनं स्वत: हॉस्पिटलमधला एक फोटो शेअर केला आहे.
गेलने चाहत्यांना दिला खास संदेश
“मी तुम्हाला सांगतो की संघर्ष केल्याशिवाय मी माघार घेत नाही. मी युनिव्हर्सल बॉस आहे. ते कधीही बदलू शकत नाही. आपण माझ्याकडून शिकू शकता मात्र मी तो नाही आहे ज्याच्या सगळ्या गोष्टींचे तुम्ही अनुसरण करू शकता. आपली स्टाइल विसरू नका,” असा खास संदेश देत त्यानं चाहत्यांचा मनोधैर्य वाढवलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- आज बिस्किट वाटपाचा जाहीर कार्यक्रम : वाघ
- निवडणूक आयोगानं शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ नाकारत ‘बिस्किट’ दिलं
- नियम मोडून एसटी प्रवास करणाऱ्या नवनीत राणांवर कारवाई होणार का?
- राजा सेन म्हणतात, प्रेक्षक सिनेमागृहात येऊ नये म्हणून लढवली शक्कल…
- हाथरस प्रकरण : सीबीआयने हाती घेतली तपासाची सूत्रे ; गुन्हा केला दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

