पटना- उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणानंतर तीव्र पडसाद देशभरात उमटले. विरोधकांकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर प्रचंड टीका झाली. त्यामुळे योगी सरकारनं सीबीआय चौकशीची शिफारस केली होती.
हाथरसमधील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपास हाती घेतल्यानंतर सीबीआयनं प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपासासाठी समितीही नियुक्त केली आहे.सीबीआयकडून माहिती देण्यात आली. एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू करण्यात आला आहे, असं सीबीआयनं म्हटलं आहे.
हाथरसमध्ये झालेल्या या घटनेननंतर देशात संतापाची लाट उसळी होती. या घटनेचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी होत होती. या आगोदर या प्रकरणाचा तपास आतापर्यंत एसआयटी करीत होती. त्यांनी गावातील 40 जणांना नोटीस पाठवून अनेकांचा जबाबही घेतला होता. दरम्यान, आता या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत असून अनेक संघटना या साठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या-
- #Corona : कॉन्टक्ट ट्रेसिंगमध्ये लातूर पॅटर्न ठरतोय आदर्श
- निवडणूक आयोगानं शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ नाकारत ‘बिस्किट’ दिलं
- रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा – पडळकर
- भारतात गांजा कायदेशीर झालाच पाहिजे ; अभिनेता रणवीर शौरीचे वादग्रस्त वक्तव्य
- सरकारी निधीतून चालवले जाणारे मदरसे नोव्हेंबरपासून बंद करण्याचा भाजपा सरकारचा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

