Share

IPL 2022 MI vs KKR: रोहित शर्माचा ‘फेव्हरेट शॉट’च ठरला अडचणीचा, उमेश यादवने जाळ्यात अडकवले!

Published On: 

मुंबई: आयपीएल २०२२ मध्ये अजूनही रोहित शर्माच्या बॅटमधून मोठी खेळी आलेली नाही. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यात रोहित स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करत केकेआरच्या गोलंदाजांनी पलटणच्या फलंदाजांना हैराण करून सोडले.

नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्माने (rohit sharma) सांगितले की, मलाही प्रथम फलंदाजी करायची होती. पण आता फलंदाजी करताना रोहित शर्माचा फ्लॉप शो सुरूच आहे. यंदाच्या हंगामात कहर करणारा उमेश यादव कोलकाता विरुद्ध मुंबई सामन्यात आपला वेग कायम राखतानाही चमकदार गोलंदाजी करताना दिसत आहे. या मोसमात सलामीच्या षटकात विकेट्स मिळवण्याची परंपरा कायम ठेवत उमेश यादवने (umesh yadav) रोहितला त्याच्या आवडत्या पुल शॉटवर बाद केले.

https://twitter.com/MohitKu38157375/status/1511714425627353093?s=20&t=Vb0aTCUTjQ3JaYH4x70ZYg

मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवातीची षटके अतिशय संथपणे पार पडत आहेत, तिसर्‍या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहित शर्माला उमेश यादवने वेगवान गोलंदाजी केली, ज्याला खेचताना रोहितने सीमारेषेबाहेर मारण्याचा प्रयत्न केला. पण बॅटच्या वरच्या काठावर आदळल्याने चेंडू हवेत गेला आणि कीपर सॅम बिलिंग्सने त्याचा झेल घेतला. रोहित शर्मा १३ चेंडू खेळून केवळ ३ धावा करून बाद झाला.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!