Share

IPL 2022 KKR vs MI : सूर्यकुमारचं दमदार पुनरागमन..! मुंबई इंडियन्सचं कोलकात्याला १६२ धावांचं आव्हान

Published On: 

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर आज आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना रंगत आहे. या सामन्यात कोलकाताचा कप्तान श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून रोहित शर्माच्या मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले या सामन्यातून संघासाठी पुनरागमन करणाऱ्या सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी करत मुंबई इंडियन्सला २० षटकात ४ बाद १६१ अशी धावसंख्या गाठून दिली. शेवटच्या षटकात कायरन पोलार्डने केलली फटकेबाजी मुंबईच्या चाहत्यांसाठी आनंददायी ठरली.

मुंबईचा डाव

सलामीवीर फंलदाज इशान किशनसह मैदानात उतरलेला मुंबईचा कप्तान रोहित शर्मा (३) या सामन्यात जास्त काही करू शकला नाही. स्पर्धेत भन्नाट फॉर्मात असणारा कोलकात्याचा वेगवान गोलंदाज उमेश कुमारने त्याला झेलबाद केले. इशानही (१४) पॅट कमिन्सचा बळी ठरला. बेबी एबी डेवाल्ड ब्रेविसने स्फोटक पदार्पण करत २ चौकार आणि २ षटकारासह २९ धावा केल्या. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने त्याला फसवले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मावने अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांनी संयमी आणि शेवटी आक्रमक पवित्रा धारण करत फटकेबाजी केली. सूर्याने ५ चौकार आणि २ षटकार करत ५२ धावांची खेळी केली. २०व्या षटकात तो बाद झाला. याच षटकात फलंदाजीला आलेल्या कायरन पोलार्डने ५ चेंडूत ३ षटकार ठोकत २२ धावा केल्या. त्याच्यामुळे संघाला दीडशेपार पोहोचला आले. तिलकने ३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३८ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेचा बेबी एबी म्हणजेच डेवाल्ड ब्रेविसने मुंबईकडून पदार्पण केले. कोलकाताकडून रसिक सलाम आणि पॅट कमिन्स यांना संधी मिळाली.

दोन्ही संघांची Playing XI

कोलकाता नाइट रायडर्स – अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), सॅम बिलिंग्ज (यष्टीरक्षक), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरिन, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिक सलाम, वरुण चक्रवर्ती.

मुंबई इंडियन्स – इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कप्तान), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेविस, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!