Share

बेंगळुरूमध्ये होणार IPL चा मेगा लिलाव; तारखा जाहीर

Published On: 

नवी दिल्ली : आयपीएल (PL 2022) ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. पुढील वर्षी आयपीएलमध्ये दोन नवीन संघ खेळताना दिसणार आहेत. यामुळेच आयपीएल मेगा लिलाव होणार आहे. या गोष्टीबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. सर्वच संघांनी काही महत्त्वाच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये कायम ठेवलेले नाही. अशा परिस्थितीत कोणते खेळाडू कोणत्या संघात सामील होतील हे पाहण्याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, IPL 2022 च्या लिलावाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. IPL 2022 चा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. आयपीएलच्या अधिकाऱ्यांनी सर्व फ्रँचायझींना याबाबत माहिती दिली आहे.

आयपीएलच्या पुढील सीझनसाठी मेगा लिलाव होणार आहे. यावेळी 10 संघ लिलावात सहभागी होतील कारण लखनऊ आणि अहमदाबाद हे आणखी दोन संघ आयपीएलमध्ये सामील झाले आहेत. अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांच्यासाठी आयपीएल लिलावादरम्यान बोली लावली जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!