मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधक मुख्यमंत्रिपदाबाबत अनेक सल्ले देत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली, तर ते अधिवेशन संपायच्या आत ४ दिवसांत राज्य विकूनच मोकळे होतील, अशी खोचक टीका पडळकरांनी केली आहे.
पडळकरांच्या या टीकेवर आता आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी प्रत्युत्तर दिले असून ते म्हणाले आहेत की,’ज्या व्यक्तीचा महाराष्ट्राच्या जनतेशी तीळमात्र संबंध नाही, ती व्यक्ती अजित पवार यांच्याबद्दल बोलते, याचा काय संबंध. लाल बहादूर शास्त्री यांनी पंतप्रधान असताना देशात अन्नत्याग आंदोलनाचे आवाहन केले होते. त्यावेळी, देशातील संपूर्ण जनतेने त्यांना पाठिंबा दिला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन शेती कायदे मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतरही शेतकऱ्यांनी संसदेत हे कायदे मागे घ्या, तेव्हाच आंदोलन संपण्याची भाषा केली. त्यामुळे, जनतेचा मोदींवर विश्वास नसून भाजप ही त्यांचीच बेताल पार्टी आहे’, असे मिटकरी म्हणाले. तसेच राज्य विकणं यांना चहा विकण्यासारखं वाटलं का? असा सवालही मिटकरींनी केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अधिवेशनासाठी हजर राहू शकले नाहीत. त्यांनी काही काळ घरी बसून विश्रांती घ्यावी. काही काळ मुख्यमंत्रिपदाचा भार आदित्य ठाकरे किंवा अजित पवारांकडे सोपवावा, अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही; कारण..’
- “पडळकरांनी अजितदादांवर केलेले आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने…”
- वाजपेयीजींना विसरून चोर दाराने उद्योग करायचा असेल तर ते योग्य नाही- नवाब मलिक
- समीर वानखेडेंच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत धक्कादायक माहिती समोर
- सचिन सावंतांनी शेअर केला मोदींचा लोकसभेतील ‘तो’ व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

