Share

आपल्या कृषीप्रधान भारतीय समाजाचा पाया म्हणजे अन्नदाता शेतकरी- चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशभरात आजचा दिवस अर्थातच २३ डिसेंबर हा ‘राष्ट्रीय किसान दिन’ म्हणून साजरा केला जातो. खरे तर भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंह(Chaudhari Charansingh) यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. चरणसिंह यांनी देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी भरीव कामगिरी केली आहे. दरम्यान, राष्ट्रीय किसान दिनानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’आपल्या कृषीप्रधान भारतीय समाजाचा पाया म्हणजे अन्नदाता शेतकरी. विकासपुरुष मा. नरेंद्र मोदीजी यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासालाच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सर्व शेतकरी बंधू-भगिनींना राष्ट्रीय किसान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.’

दरम्यान, पंतप्रधान चौधरी चरणसिंग हे अत्यंत कमी काळासाठी पंतप्रधान असले तरी त्यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक परिश्रम घेतले आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजनाही सुरू केल्या. तसेच २००१ साली शेतकर्‍यांचे जीवन आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणं सुरु करणाऱ्या चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस हा ‘राष्ट्रीय किसान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!