Share

विराट कोहलीच्या संघाकडून सुनील गावस्कर यांना मोठ्या अपेक्षा, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारतीय संघाने गेल्या 7 वेळा दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीवर पराभूत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्यात भारतीय संघाला अजूनही यश मिळवता आले नाही. भारतीय दिग्गज सुनील गावस्कर (sunil gavskar) यांच्या मते आगामी दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या भूमीवर पराभूत करण्याची भारताकडे सुवर्णसंधी आहे. विराट कोहलीचा संघ विजय मिळवण्यात यशस्वी झाला तर तो सर्वकाही साध्य करेल. असही गावस्कर म्हणाले आहेत.

स्पोर्टस्टारच्या एका स्तंभात, भारतीय फलंदाज सुनील गावस्कर यांनी लिहिले, “जर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत जिंकला तर ती खरोखर अभिमानाची गोष्ट असेल आणि भारत सर्व कसोटी खेळणाऱ्या राष्ट्रांमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे चक्र पूर्ण करेल. दक्षिण आफ्रिका हा शेवटचा अडथळा आहे.

भाताने दक्षिण आफ्रिकेत एकूण 20 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त तीनच सामने त्यांनी जिंकले आहेत. संघाने 10 सामने गमावले असून 7 सामने अनिर्णित राखण्यात यश आले आहे.

2018 मध्ये भारतीय संघाला 2-1 ने मालिका गमवावी लागली होती.गावसकर यांना या वेळी परिस्थिती वेगळी आहे असे वाटते. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे.दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याची भारताकडे सर्वोत्तम संधी आहे,

गावस्कर पुढे म्हणाले, ‘भारतीय गोलंदाजी आवडणाऱ्या क्विंटन डी कॉकबद्दल चर्चा आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आफ्रिकेची फलंदाजीची फळी थोडी कमकुवत दिसत आहे. त्यामुळे भारताला मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!