मुंबई : इंग्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत सॅम करणने शानदार कामगीरी करत चाहत्यांची मने जिंकली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सॅम करनने ४८ धावात ५ गडी बाद केले होते. त्याच्या या कामगीरीनंतर त्याच्यावर सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सॅम करणने केलेल्या या कामगिरीला बीसीसीआयची आयपीएल स्पर्धा जबाबदार आहे असे इंग्लंडचे माजी क्रिकेटपटु ग्रॅहम थॉर्प यांनी म्हणले आहे. गेल्या काही महिन्यात सॅम करन हा इंग्लंडसाठी एक विश्वासू अष्टपैलु खेळाडू म्हणून उदयास आलेला आहे. याचे पुर्ण श्रेय आयपीएल स्पर्धेला जाते असे ते म्हणाले. ‘सॅम हा फलंदाज म्हणून उत्कृष्ट होताच मात्र आयपीएल स्पर्धेतील अनुभवामुळे दबावाच्या क्षणी गोलंदाजी करत त्याने त्याचे महत्व सिद्ध केले आहे.’ असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले,’आगामी काळात क्रिकेटच्या तिनही प्रकारात तो एक चांगला खेळाडू बनावा अशी आमची इच्छा आहे. टी-२० नंतर तो आता एकदिवसीयमध्येही चांगली कामगीरी करत आहे. त्याने आता कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगीरी करण्यासाठी प्रयत्न करावे’, असे ते म्हणाले. सॅम करन हा गेल्या वर्षीपासुन आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडुन खेळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- बाग आहे की शेत? पहा काय-काय पिकवते प्रीती झिंटा बागेत
- ‘…हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही’ ; राजू सापतेंच्या आत्महत्येनंतर मनसे आक्रमक
- मराठी कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या, व्हिडिओद्वारे सांगितलं सुसाईडचे कारण
- बुलडाण्यात समाधानकारक पाऊस; ६६ टक्के पेरण्या आटोपल्या!
- अण्णा हजारे हे कायम कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या निशाण्यावर का असतात ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

