मुंबई : बॉलीवूड सेलिब्रिटी यांचे घर हे अलिशान असते. त्यांच्या घरामध्ये त्यांना सगळ्याच सोई सुविधा उपलब्ध असतात. मात्र अभिनेत्री प्रिती झिंटाच्या अलिशान घरात शेती असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. तिच्या घरात भाज्यांपासुन ते फळांपर्यत सर्वकाही तिथेच तयार होतं. सध्या अनेक लोक छोटी शेती करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
https://www.instagram.com/p/CQ0J8PnHTng/?utm_source=ig_web_copy_link
लॉकडाउन दरम्यान अनेक लोकांनी तसेच काही सेलिब्रिटी देखील घरातील गार्डन मध्ये किंवा गॅलरीतही भाज्या फळ पिकवत असल्याचे दिसते. असेच प्रीती झिंटा देखील करते, प्रीतीने तिच्या बागेत फुलझाडे तसेच घरातील उपयोगी आणि कोणत्याही रासायनिक खत, प्रक्रिया रहित ताज्या भाज्या आणि फळं ते ही घरच्या घरी होत आहे. यावेळी तिच्या बागेतील स्टॉबेरी पिकलेली प्रिती दाखवत आहे. या व्हिडिओतून ती आनंदी असल्याचे दिसत आहे.
याआधीही तिने अनेक गोष्टी घरीच उगवल्या होत्या. मागील लॉकडाउनमध्ये तिने सिमला मिरची, टोमॅटो अश्या फळभाज्या घरीच पिकवल्या आहेत. याचे व्हिडीओ ती नेहमी चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे हे काम पाहून अनेकजण सोशल मिडियावर तिचे कौतुक करतात.
महत्वाच्या बातम्या
- ‘…हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही’ ; राजू सापतेंच्या आत्महत्येनंतर मनसे आक्रमक
- मराठी कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या, व्हिडिओद्वारे सांगितलं सुसाईडचे कारण
- बुलडाण्यात समाधानकारक पाऊस; ६६ टक्के पेरण्या आटोपल्या!
- अण्णा हजारे हे कायम कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या निशाण्यावर का असतात ?
- ‘देशात मुर्खता मोठ्या प्रमाणात’ ; मंदिरा बेदीला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांवर भडकली सोना मोहपात्रा


