🕒 1 min read
मुंबई : दिवगंत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. मराठी सिनेमा आणि टेलिव्हीजन इंडस्ट्रीत कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी आज आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली.
राजू साप्ते यांनी आपल्या पुण्यातील घरात आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ तयार केला आहे. त्यामध्ये त्यांनी आत्महत्येचं कारण सांगितल आहे. ‘नमस्कार मी राजेश मारुती साप्ते. मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचारपूर्वक मी हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. हा व्हिडीओ बनवताना मी भानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मला लेबर युनियनमधल्या राकेश मौर्या यांच्याकडून खूप त्रास दिला जात आहे.’
पुढे ते म्हणाले, मी आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणतेही पैसे थकीत नाहीत, सर्व पेमेंट पूर्ण झालेलं असतानाही राकेश मोर्या कामगारांना भडकवत आहेत. त्यामुळे माझे अनेक प्रोजेक्ट अडकले आहेत. माझं पुढचं काम राकेश मोर्या सुरु करु देत नाहीत. माझ्याकडे सध्या ५ प्रोजेक्ट आहेत. एक प्रोजेक्ट मला याच कारणामुळे सोडावं लागलं. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत असल्याचं साप्ते यांनी व्हिडिओत म्हटलं आहे. तसेच, मला न्याय मिळावा अशी मागणीही त्यांनी याच व्हिडिओ द्वारे केली आहे.
त्यांच्या या व्हिडिओनंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची आता पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणावर मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यापुढे कोणताही निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांना युनियनच्या लोकांनी सेटवर जाऊन त्रास दिल्यास हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच खोपकर यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- वयाचा आणि कोरोनाचा मुद्दा पुढे करून ईडीच्या चौकशीला दांडी मारणारे देशमुख दिल्लीला गेलेच कसे ?
- के एल राहुल कर्णधार विराटचा फेवरेट पण राहुलचा फेवरेट कर्णधार माहीच
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी आपल्याच कर्णधाराला ठेवलं टीमबाहेर
- नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी RBIची ‘या’ बँकांवर मोठी कारवाई
- ईडीसह अन्य तपास यंत्रणांमुळे राज्यातील अनेक दिग्गज नेते लवकरच अडचणीत येणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

