दुबई : यंदा कोरोनाच्या सावटातुन मार्ग काढत नुकत्याच सुरुवात झालेल्या आयपीएलला खेळाडूंच्या दुखापतीचे ग्रहण लागले आहे. सनरायझर्स हैद्राबादच्या मिशेल मार्शला दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घ्यावी लागली आहे. यातच आता चेन्नई सुपर किंग्जला देखील मोठा धक्का बसला आहे.
या सत्रात स्टार स्पिनर हरभज सिंग आणि महत्वाचा फलंदाज सुरेश रैनाला ऐनवेळी घ्यावी लागलेल्या माघारीनंतर आता चांगल्या लयीत असलेल्या अंबाती रायडूला दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावं लागणार आहे. मुंबई विरुद्ध झालेल्या पाहिल्या सामन्यात हिरो ठरलेल्या अंबातीला दुखापत झाल्याने चेन्नईच्या चिंतेत वाढ झाली आहे.
याआधी राजस्थान रॉयल्ससोबतच्या सामन्यात देखील अंबाती खेळू शकला नव्हता. यानंतर त्यांच्या पुढील खेळाबाबत चाहत्यांमध्ये मोठी संभ्रमता निर्माण झाली आहे. यावर CSK च्या सीईओंनी महत्वाची माहिती दिली आहे. रायडुला झालेली दुखापत जास्त गंभीर नसून सद्या तो हेमस्ट्रिंग इंज्युरीचा सामना करत आहे.
रायडुच्या पुढील खेळाचं काय?
रायडू सद्या दुखापतग्रस्त असला तरी त्याची इंज्युरी गंभीर नसल्याने तो आणखी एक सामना खेळू शकणार नाही. मात्र यानंतर तो अधिक जोमाने मैदानावर खेळण्यासाठी उतरेल असा विश्वास संघाच्या सीईओंनी व्यक्त केल्याने आता चाहत्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- कंगनाचे कार्यालय तोडण्यासाठी दाखवलेली तत्परता पाण्याच्या निचऱ्यासाठी का नाही दाखवली? भाजप पदाधिकाऱ्याचा सवाल
- लकमंत्री आदित्य ठाकरेंची महापालिका अपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट
- तू काय मदर तेरेसा लागून गेलीस का? वाचाळ कंगनाला सुनावले…
- मुख्यमंत्र्यांचे नातेवाईकचं नाणारच्या व्यवहारात सामील; निलेश राणेंचे मोठे वक्तव्य
- मरणोत्तर पद्म पुरस्कारासाठी महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची राज्य सरकारने केली शिफारस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

