कोल्हापूर : महान कुस्तीपटू व ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या शिरपेचात आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडणार आहे. खाशाबा जाधव यांच्या अमुल्य योगदानासाठी त्यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्यात यावा या कुस्तीप्रेमींच्या अनेक वर्षांच्या मागणीची दखल अखेर राज्य सरकारने घेतली आहे.
कोल्हापूरचे शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी याबाबत ट्विट केले असून खाशाबा जाधव यांची शिफारस केल्याबद्दल त्यांनी मंत्री आदित्य ठाकरेंचे आभार देखील मानले आहेत. ” कुस्तीप्रेमिंच्या मागणीची दखल घेत मरणोत्तर पद्म पुरस्कारासाठी ऑल्म्पिकविर खाशाबा जाधव यांच्या नावाची केंद्राला शिफारस केल्याबद्दल पर्यावरण मंत्री ना.आदित्यजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील पद्म पुरस्कार समितीचे आभार.” असे ट्विट राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
कुस्तीप्रेमिंच्या मागणीची दखल घेत मरणोत्तर पद्म पुरस्कारासाठी ऑल्म्पिकविर खाशाबा जाधव यांच्या नावाची केंद्राला शिफारस केल्याबद्दल पर्यावरण मंत्री ना.आदित्यजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील पद्म पुरस्कार समितीचे आभार.#padmaforkhashabajadhav@OfficeofUT@AUThackeray@CMOMaharashtra pic.twitter.com/siUuN4M1X1
— Rajesh Kshirsagar (@Rajesh9099) September 24, 2020
त्यामुळे इतिहासातील गौरवशाली विक्रम करणाऱ्या या कुस्तीपटूची दखल घेऊन केंद्र सरकार मरणोत्तर पद्म पुरस्कार देणार का? याकडे आता कुस्तीप्रेमींचे लक्ष्य लागले आहे.
ऑलम्पिकमध्ये पहिलं पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधवांकडे झाले दुर्लक्ष!
कराडच्या गोळेश्वर गावात १९२६ साली जन्म झालेल्या खाशाबांनी भारताला स्वातंत्र्योत्तर काळातील पहिले वैयक्तिक ऑलम्पिक पदक पटकावून दिले होते. १९५२ सालच्या ऑलम्पिकमध्ये त्यांनी फ्रीस्टाईल कुस्ती विभागात कांस्यपदक जिंकले होते. खाशाबा जाधव हे असे एकमेव खेळाडू असतील जे ऑलम्पिक पदक पटकावून देखील त्यांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला नाही.
खाशाबांनी कोल्हापूरमध्ये कुस्ती फडांचे आयोजन करत कुस्तीला दिलेली वाव आज देखील जगप्रसिद्ध आहे. खाशाबांनी ऑलम्पिक पदक जिंकून देखील या आयोजन केलेल्या कुस्ती फडात पुढाकाराने सहभाग घेऊन अनेक कुस्त्या लढवल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या :
- राहुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे कोणाला संधी देणार?
- कंगनाचे कार्यालय तोडण्यासाठी दाखवलेली तत्परता पाण्याच्या निचऱ्यासाठी का नाही दाखवली? भाजप पदाधिकाऱ्याचा सवाल
- लकमंत्री आदित्य ठाकरेंची महापालिका अपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट
- तू काय मदर तेरेसा लागून गेलीस का? वाचाळ कंगनाला सुनावले…
- मुख्यमंत्र्यांचे नातेवाईकचं नाणारच्या व्यवहारात सामील; निलेश राणेंचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

