🕒 1 min read
बंगळूरू: IPL 2022 च्या लिलावात दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार फाफ डुप्लेसिसला (Faf Duplessis will play for Bangalore) रॉयल चैलेंजर्स बंगलोरने तब्बल ७ कोटींमध्ये खरेदी केले आहे. यापूर्वी तो चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. यांनतर त्याने भावूक व्हिडिओ शेअर (Faf Duplessis shared an emotional video) करत चेन्नईप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
“मला फक्त चेन्नईचे आभार मानायचे आहेत. चाहते, कर्मचारी, व्यवस्थापन आणि खेळाडू यांचे सर्वांचे आभार. तुम्ही खूप खास आठवणी निर्माण केल्या आहेत. मला वाटते की धन्यवाद म्हणणे माझ्यासाठी खरोखर महत्वाचे आहे. मी माझ्या वेळेचा खूप आनंद लुटला आहे. मला तिथल्या प्रत्येकाची आठवण येईल”,असे डु प्लेसिसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सीएसकेने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
????#SuperKingForever @faf1307 pic.twitter.com/rt3MUcOD4o
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) February 13, 2022
तसेच आरसीबी संघात स्थान मिळाल्यानंतर डु प्लेसिसने म्हटले की, “नवीन प्रवासासाठी मी खूप उत्साहित आहे. एक दार बंद होते तसे एक नवीन दारही उघडते आणि ते मोठ्या संधी घेऊन येते. भविष्यात काय आहे हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून तुमचे खूप खूप आभार.”
दरम्यान IPL 2021 च्या फायनलमध्ये फाफ डुप्लेसिसने ८६ धावांची धमाकेदार इनिंग खेळून चेन्नई सुपर किंग्जला चौथ्यांदा चॅम्पियन बनवण्यात मोठे योगदान दिले होते. पण तरीही CSKने त्याला कायम न ठेवल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. गेल्या मोसमात त्याने १६ सामन्यात ६३३ धावा केल्या होत्या. तो आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणारा परदेशी खेळाडू ठरला होता.
महत्वाच्या बातम्या:
- IPL Auction 2022 : स्पर्धेत खेळणार नसला तरी, ‘हा’ खेळाडू गेला कोटींच्या घरात
- पंजाब निवडणूक प्रचार दौऱ्यात प्रियांका गांधींची आम आदमी पक्षावर सडकून टीका, म्हणाल्या…
- उत्पल पर्रीकरांनी अपक्ष निवडणूक लढवल्याबद्दल फडणवीसांनी व्यक्त केली खंत; म्हणाले…
- IPL AUCTION 2022: अरे बावा! अंडर १९चा स्टार पंजाबमध्ये गेला कोटीत
- काँग्रेसला पर्रीकरांवर बोलण्याचा अधिकार आहे का?- देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
