🕒 1 min read
बंगळूरू: IPL 2022 मेगा ऑक्शनमध्ये पंजाब किंग्स हा सर्वात मोठी रक्कम पर्समध्ये असणारा संघ होता. पंजाब ७२ कोटींसह ऑक्शनमध्ये उतरला होता. पंजाबने चार पैकी केवळ दोन रिटेंशन कार्ड वापरले. ज्यात त्यांनी मयंक अग्रवाल आणि अर्शदीप सिंग यांना रिटेन केले. मात्र त्यांनी ऑक्शनमध्ये कोणताही वेळ वाया घालवला नाही आणि १० पैकी दोन मार्की खेळाडूंना संघात निवडले.
पंजाब किंग्सकडे मोठे बजेट बाकी असल्यामुळे त्यांनी अनेक खेळाडूना कोटींच्या घरात खरेदी केले. दिल्ली कॅपिटल्स जोडी कागिसो रबाडा ९.२५ कोटी आणि शिखर धवन ८.२५ कोटी यांना पंजाबने खरेदी केला आहे. शिखर धवनला बरेच जण पंजाबचा कर्णधार म्हणून पाहत आहेत. त्यांनी इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टो ला ६.७५ कोटीत खरेदी केले आहे. पंजाबने अनेक भारतीय खेळाडूंनाही संघात सामील केले आहे. त्यामुळे पंजाबचा हा नवाकोरा संघ आता स्पर्धेत उतरणार आहे.
पंजाब किंग्सचा संघ: मयंक अग्रवाल, अर्शदीप सिंग, शिखर धवन, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज बावा, ऋषी धवन, प्रेरक मानका. , वैभव अरोरा, रिटिक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्षे, बेनी हॉवेल
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील’-संजय राऊत
- “…याला म्हणतात हात दाखवून अवलक्षण”, भातखळकरांचा हल्लाबोल
- ‘सागर’ बंगल्यावरील कॉंग्रेसने आंदोलन मागे घेतले; नाना पटोलेंची घोषणा
- ‘हमने बहुत बरदाश किया है, बरबाद भी हम ही करेंगे’; संजय राऊतांचा इशारा
- Goa Assembly elections 2022 : मोदींच्या प्रमोद सावंत यांना शुभेच्छा; ११ वाजेपर्यंत २६.६३ टक्के मतदान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
