Share

‘सागर’ बंगल्यावरील कॉंग्रेसने आंदोलन मागे घेतले; नाना पटोलेंची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याचा कॉंग्रेसकडून राज्यभर निषेध केला जात आहे. आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर कॉंग्रेस आंदोलन छेडणार होते. मात्र त्यांच्या घराच्या गेटसमोरच पोलिसांनी त्यांना अडवले आहे. नाना पटोले आणि वारकरी संप्रदाय यांनी मिळून आंदोलन सुरु केले. मात्र हे आंदोलन तात्पुरते  मागे (Congress withdraws agitation on Sagar Bungalow) घेतले असल्याची घोषणा नाना पटोले यांनी केली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची बदनामी केली, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांचा अपमान केला, त्याबद्दल भाजपने एकदा सांगावे, की आम्ही चूक केली असून आम्ही त्याचे समर्थन करत नाही.”, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. तसेच मोदींनी महाराष्ट्राचा अवमान केला आहे. त्याचाच आम्ही निषेध करत आहोत. भाजपने त्यांच्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांना रस्त्यावर उतरवलं. मुंबईकरांना अडचणीत आणण्याचं काम केलं. आम्ही तत्त्वाची लढाई लढत आहोत. आम्ही हे कदापी सहन करणार नाही. आजचं आंदोलन आम्ही थांबवलं असलं तरी भाजप खासदारांच्या घरासमोरील आमचं आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

तसेच सध्या मुंबईकरांच्या अडचणी बघून आजचे आंदोलन कॉंग्रेस मागे घेत आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. दरम्यान काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना ‘सागर’ बंगल्याजवळून पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दुसरीकडे भाजप नेते राम कदम यांनी स्वतःच अपयश झाकण्यासाठी कॉंग्रेसची नौटंकी असल्याची टीका केली आहे. दरम्यान बाबुलनाथ परिसरातून भाजप कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!