चंद्रपूर : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) हे काल(१३ फेब्रु.) चंद्रपूर दौऱ्यावर होते. यावेळी बोलत असतांना आदित्य यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच सरकार गेल्यापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) फ्रस्ट्रेशनमध्ये आले असून विरोधी पक्षाच्या वागण्यात ते दिसते, असेही आदित्य म्हणाले आहेत.
यावेळी बोलत असतांना आदित्य ठाकरे म्हणाले की,‘सरकार गेल्यापासून दोन वर्षात फडणविसांमध्ये फ्रस्ट्रेशन आले असून विरोधी पक्षाच्या वागण्यात ते दिसत आहे. कधी म्हणतात मुख्यमंत्री आहे, कधी म्हणतात नाही. कधी म्हणतात सरकार आहे, तर कधी म्हणतात नाही. परंतु, लोकांचा सरकारवर विश्वास आहे. जे डोळे बंद करुन फिरतात त्यांना काहीच दिसणार नाही’, असे ठाकरे म्हणाले आहेत.
बगड खिडकी, चांदा किल्ला येथे स्वच्छता अभियानाची पाहणी केली. आपल्या ऐतिहासिक वारस्याचे संवर्धन करणारी ही मोहीम अतिशय महत्त्वाची असून संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. pic.twitter.com/CSyq8UqmvF
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 13, 2022
दरम्यान, या दौऱ्यावेळी आदित्य यांनी शहरातील गोंडकालीन रामाळा तलावाच्या काठाशी त्यांनी तलावाच्या खोलीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामाची पाहणी केली. तसेच ईको प्रो संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गोंडकालीन १२ किलो मीटर लांब किल्ला परकोट ‘हेरिटेज वॉक’च्या बगड खिडकी टप्प्याची पाहणीही केली. तद्पश्चात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरण विभागाच्या आढावा बैठकीतही सहभाग घेतला.
महत्वाच्या बातम्या :
- बजाज यांच्या निधनाने उद्योग जगतानेच नव्हे तर देशाने एक बेडर आवाज गमावला- संजय राऊत
- ‘…त्यामुळेच ते अशाप्रकारचं वक्तव्य करतात’; खडसेंनी उडवली चंद्रकांत पाटलांची खिल्ली
- शिवभोजन थाळी केंद्रावरील गैरप्रकारावरून छगन भुजबळ यांचा कारवाईचा इशारा
- पुण्यातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य वन विभागाकडे हस्तांतरित होणार; मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा
- काँग्रेसचा पंजाबसाठीच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस; मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी केली घोषणा


