मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) माजी कर्णधार विराट कोहलीने एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा एबी डिव्हिलियर्सने मला सांगितले की तो यापुढे आरसीबीसाठी खेळणार नाही, तेव्हा हे ऐकून मी खूप भावूक झालो, असे विराट म्हणाला.
एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. आरसीबीकडून खेळताना या दोन्ही खेळाडूंनी संघासाठी अनेक सामने जिंकले. गेल्या वर्षी एबीने क्रिकेटमधून पूर्ण निवृत्ती जाहीर केली होती. डिव्हिलियर्सने वाढते वय हे निवृत्तीचे प्रमुख कारण सांगितले. डिव्हिलियर्सच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आफ्रिकेकडून ११४ कसोटी, २२८ एकदिवसीय आणि ७८ टी-२० सामने खेळले. त्याच वेळी, तो आयपीएलमध्ये १८४ सामन्यांमध्ये खेळला आहे.
विराट म्हणाला, ”मला अजूनही आठवते की तो जेव्हा निवृत्त झाला तेव्हा त्याने मला एक वॉइस नोट पाठवली. आम्ही दुबईला वर्ल्डकप खेळण्यासाठी येत होतो आणि मला एक वॉइस नोट मिळाली. तेव्हा अनुष्का माझ्यासोबत होती. मी तिच्याकडे पाहिले आणि तिची प्रतिक्रिया होती “काय?” ती पुढे म्हणाली, प्लीज असे काही सांगू नकोस. ही खूप विचित्र भावना होती. मी खूप भावूक झालो. माझ्या सुख-दु:खात डिव्हिलियर्स माझ्या पाठीशी उभा राहिला.”
महत्त्वाच्या बातम्या –
- पवार साहेबांनी आडनाव बदलून ‘आगलावे’ ठेवावं – सदाभाऊ खोत
- विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबद्दल प्रस्ताव मांडणार – दिलीप वळसे पाटील
- ‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाचा सेक्सी वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल
- शेन वॉर्नला श्रद्धांजली देताना शेवटी सचिननं ‘ती’ गोष्ट केली कबूल; म्हणाला, “त्याच्याविरुद्ध खेळण्यासाठी…”
- “ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेवून नको त्या गोष्टी…”- यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

