Share

IPL 2022 : रेस प्लेऑफची! ४ सामने अन् ५ संघाचं भवितव्य; कोण मारणार बाजी?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगाम आता प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करत आहे. यंदाच्या हंगामातील ६६वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईतील डी वाय स्टेडीयमवर खेळला गेला. लखनऊने कोलकाताचा 2 धावांनी पराभव केला. लखनऊ संघ या विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानांवर पोचला आहे. त्यामुळे प्लेऑफची लढत आता रोमांचक झाली आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता हे तीन संघ आता प्लेऑफमधून बाहेर पडले आहे. तर गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांनी प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे. परंतु उरलेल्या दोन जागांसाठी अजूनही ५ संघ प्लेऑफमध्ये जाण्यासाठी झुंज देत आहेत.

लखनऊ आणि कोलकाता यांनी हंगामातील त्यांचे साखळी फेरीतील सर्व १४ सामने खेळले आहेत. आता बाकीच्या संघांना आजून त्यांचा प्रत्येकी १ सामना खेळायचा आहे. गुणतालिकेत राजस्थान १६ गुणांसह तिसऱ्या स्थानांवर आहे. पण नेट रनरेट वरून इतर संघही वर जाऊ शकतात. जर राजस्थानला प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करायच असेल तर २० मे ला कोणत्याही परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्जला हारवाव लागेल.

बंगळूरूला जर प्लेऑफ मध्ये प्रवेश करायचा असेल तर पुढचा सामना जिकावा लागेल. १९ मे ला बंगळूरूचा सामना गुजरातशी होणार आहे. त्याचे आता गुणतालिकेत १४ गुण आहेत. त्यांनी गुजरातला हरवले तर प्लेऑफचे स्थान निश्चित होईल. परंतु त्याचा रन रेट -323 आहे त्यामुळे त्यांना पुढच्या सामन्यात मोठा विजय मिळवणे गरजेचे आहे.

दिल्लीला २१ तारखेला मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवून १६ गुण मिळवायचे आहेत. २२ तारखेला सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. बंगळूरू आणि दिल्ली या दोन्ही संघांनी जर सामना हारला तर हैदराबाद आणि पंजाबमधील नेट रनरेटच्या आधारे प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी असेल. हैदराबाद आणि पंजाबचे सध्या प्रत्येकी १२ गुण आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!