🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs GT) यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने गुजरातचा अष्टपैलू खेळाडू राशिद खानला त्याची बॅट भेट दिली आहे. स्वतः राशिदने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करून याची माहिती दिली आहे.
व्हिडिओमध्ये विराट कोहली आरसीबीच्या जर्सीत पॅड घातलेला दिसत आहे. त्याचवेळी राशिद गुजरात टायटन्सच्या जर्सीत दिसत आहे. आज वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी बंगळुरूसाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्सकडून खेळताना राशिद खानने एकूण १६ विकेट घेतल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CdtRp72huXi/
राशिदने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांशी बोलत आहेत. राशिद बॅटसह शॅडो सराव करत आहे. ”विराट कोहलीला भेटून तुम्हाला नेहमीच आनंद होतो, या गिफ्टसाठी धन्यवाद.” सध्याच्या आयपीएल मोसमात कोहलीची बॅट शांत आहे. अशा स्थितीत विराट आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात मोठी खेळी करेल अशी आशा आरसीबीला असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

