Share

हे माहितीय का..? IPL 2022 गाजवणाऱ्या रिंकू सिंहला BCCIनं केलं होतं सस्पेंड!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील कोलकाता नाइट रायडर्सची मोहीम बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यानंतर संपुष्टात आली. या सामन्यात केकेआरचा २ धावांनी पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने एकही विकेट न गमावता २१० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताच्या संघाला निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून २०८ धावा करता आल्या. केकेआरला सामन्याच्या इतक्या जवळ आणण्यात रिंकू सिंगची भूमिका महत्त्वाची होती. एकेकाळी तो वेगवान फलंदाजी करत असताना केकेआर हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. पण हे होऊ शकले नाही.

या सामन्यात रिंकूने फक्त १५ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४० धावा केल्या. लखनऊविरुद्ध विजयासाठी शेवटच्या षटकात २१ धावा हव्या होत्या, तेव्हा कोलकाताने रिंकूच्या फलंदाजीमुळे १८ धावा चोपल्या. स्टॉइनिसने टाकलेल्या या षटकात रिंकू पाचव्या चेंडूवर एविन लुईसकरवी झेलबाद झाला आणि सामना लखनऊने हिरावून घेतला. संघाचा पराभव झाला असला तरी रिंकूने आपले नाव सर्वत्र पोहोचवले.

फार कमी लोकांना हे माहीत असेल, की रिंकूवर बीसीसीआयने बंदी घातली होती. आयपीएल २०२२मध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या रिंकूला बीसीसीआयकडून एकदा शिक्षाही मिळाली आहे. रिंकू सिंहने २०१४ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट आणि रणजी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. २०१९ मध्ये रिंकू परवानगीशिवाय क्रिकेट खेळण्यासाठी अबुधाबीला पोहोचला होता. येथे त्याने परवानगीशिवाय टी-२० क्रिकेटमध्ये भाग घेतला. यानंतर बीसीसीआयने रिंकूला तीन महिन्यांसाठी निलंबित केले.

१२ ऑक्टोबर १९९७ रोजी अलिगढ, यूपी येथे जन्मलेल्या रिंकू सिंहला २०१७ मध्ये पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने त्याला १० लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले. पुढच्या सीझनमध्ये शाहरुख खानच्या टीमने त्याला संघात सामील केले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!