🕒 1 min read
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला टी २० सामना जिंकला आहे. तीन सामन्याच्या या टी २० मालिकेत भारतीय संघाने १-० ने आघाडी घेतली आहे. भारतने पहिल्या टी २० सामन्यात वेस्ट इंडिजला ६ विकेट्सने पराभूत केले होते.
तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना टीम इंडिया पुन्हा विंडीजला क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल. सलामीची लढत सहा गडी राखून जिंकल्यानंतर आघाडी घेतली आहे. दुसरा सामना जिंकत संघ मालिका विजयावर शिक्कामोर्तब करायचा प्रयत्न करेल. दुसरीकडे एकदिवसीय मालिकेट व्हाईट वॉश झालेला वेस्ट इंडिजचा संघ या दौऱ्यावर पहिल्या विजयासाठी संघर्ष करताना दिसत आहे.
वेस्ट इंडिजने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. मात्र भारतीय संघाने अखेरच्या सात चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. निकोलस पूरन आणि रोस्टन चेस यांनी वेस्ट इंडिजसाठी चांगली कामगिरी केली, तर रोहित शर्मा आणि नवोदित रवी बिश्नोई भारतासाठी चमकले. वेस्ट इंडिज दुसऱ्या सामन्यात विजयासाठी लढा देईल तर भारतीय संघ मागच्या सामन्यात ढासळलेल्या मधल्या फळीतील फलंदाजी सुधारण्याचा प्रयत्न करेल.
महत्वाच्या बातम्या
- “साडेसात वर्षांपासून सत्तेत असलेले मोदी सरकार चुका मान्य न करता नेहरूंना दोष देतात’, मनमोहन सिंग यांनी सुनावले
- “विराट माझ्याजवळ आला आणि मी…” ; सचिन तेंडुलकरचा मोठा खुलासा
- मुंबईत जामीन मिळताच हिंदुस्तानी भाऊला नागपूर पोलिसांनी बजावली नोटीस
- राज्यातील जनतेला वास्तव कळावे म्हणून किरीट सोमय्या आज कोर्लई गावात जाणार
- ‘देवेंद्रजी ३०-३५ पुरणपोळ्या पातेलंभर तुपासोबत खायचे’, अमृता फडणवीसांचा अजब खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
