मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज डबल हेडरचा पहिला सामना दुपारी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (SRH vs RCB) यांच्यात होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात बंगळुरूचा कप्तान फाफ डु प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आज हैदराबादकडून फजलहक फारुकी हा अफगाणी खेळाडू सामना खेळत आहे. या हंगामात उभय संघांमधील शेवटच्या सामन्यात आरसीबी केवळ ६८ धावांवर ऑलआऊट झाला आणि त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आयपीएलच्या १५व्या हंगामात, बंगळुरू ११ सामन्यांतून ६ विजयांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर सनरायझर्स हैदराबाद १० सामन्यांतून ५ विजयांसह सहाव्या स्थानावर आहे.
सुरुवातीच्या दोन पराभवानंतर सलग पाच सामने जिंकणाऱ्या हैदराबादने शेवटचे तीन सामने गमावले आहेत. संघासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे कर्णधार केन विल्यमसनची फलंदाजी, तो फॉर्मात नाही. एडन मार्करामने फलंदाजीत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे, तर राहुल त्रिपाठी आणि अभिषेक शर्मा यांनीही त्याला साथ दिली आहे. निकोलस पूरनने गेल्या दोन सामन्यांमध्ये आपली जबरदस्त फटकेबाजी दाखवली आहे. मात्र, गेल्या काही सामन्यांमध्ये संघाची भक्कम गोलंदाजी प्रभावी ठरलेली नाही. भुवनेश्वर कुमारने चांगली कामगिरी केली आहे पण उमरान मलिक चांगलाच महागड़ा ठरला आहे.
A look at the Playing XI for #SRHvRCB
Live – https://t.co/tEzGa6a3Fo #SRHvRCB #TATAIPL https://t.co/AJlux8Dwh9 pic.twitter.com/16XVWBvOVw
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2022
आरसीबीने शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून पुनरागमन केले. संघाचे अनेक आघाडीचे फलंदाज अपेक्षेप्रमाणे खेळ दाखवू शकले नाहीत. विराट कोहलीही संघर्ष करत असून त्याचा स्ट्राईक रेटही खूप महत्त्वाचा आहे. गेल्या मोसमातील स्टार ग्लेन मॅक्सवेलही अपेक्षेप्रमाणे खेळू शकला नाही. महिपाल लोमरोर आणि दिनेश कार्तिकसारखे फलंदाज सुस्थितीत आहेत आणि ही संघासाठी चांगली बातमी आहे. जोश हेझलवूड आणि हर्षल पटेल यांनी गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे, परंतु त्यांना मोहम्मद सिराजकडून आणखी चांगल्या पाठिंब्याची अपेक्षा आहे.
दोन्ही संघांची Playing 11
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंह, जगदीशा सुचित, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, उमरान मलिक.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कप्तान), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

