Share

“उंचावलेल्या वैचारिक पातळीमुळे शिवसेनेने दाऊदचा साथीदार…”, अतुल भातखळकरांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या टोळीशी संबंध असल्याचे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. याप्रकरणावरुन भाजपकडून मविआ सरकारवर टीका केली जात असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून विरोधाची वैचारिक पातळी घसरल्याने भाजपाचे ‘‘दाऊद दाऊद’’ सुरू असल्याचे म्हटले आहे. यालाच आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.

“विरोधाची वैचारिक पातळी घसरल्याने भाजपचे ‘‘दाऊद दाऊद’’ सुरू इति शिवसेना. आणि उंचावलेल्या वैचारिक पातळीमुळे शिवसेनेने दाऊदचा साथीदार मंत्रिमंडळात ठेवला आहे.”, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

नेमके काय म्हणाले संजय राऊत?

भारतीय जनता पक्षाला जळी, स्थळी, काष्ठ, पाषाणी फक्त दाऊदच दिसतो आहे. विरोधकांना बदनाम करायचे असेल किंवा विरोधकांना अडकवायचे असेल तर त्यांचा संबंध दाऊदशी जोडून मोकळे व्हायचे, हे त्यांचे धोरणच आहे. भारतीय जनता पक्षाचे सांगायचे तर दाऊद हे त्यांच्यासाठी प्रिय पात्रच बनले आहे. विरोधाची वैचारिक पातळी घसरल्याने भाजपाचे ‘‘दाऊद दाऊद’’ सुरू आहे. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

तसेच नवाब मलिक यांचे ‘डी’ गँगशी संबंध असल्याचे आरोपपत्र ‘ईडी’ने न्यायालयात सादर केले आहे. पाच हजार पानांचे हे आरोपपत्र आहे. त्या आरोपपत्रात किती तथ्य आहे, याचा फैसला लागायचा तेव्हा लागेल, पण नवाब मलिक यांना अडकविण्यासाठी ‘डी’ गँग वगैरेंचा संदर्भ जोडला जात आहे. असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!