मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या टोळीशी संबंध असल्याचे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. याप्रकरणावरुन भाजपकडून मविआ सरकारवर टीका केली जात असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.
भारतीय जनता पक्षाला जळी, स्थळी, काष्ठ, पाषाणी फक्त दाऊदच दिसतो आहे. विरोधकांना बदनाम करायचे असेल किंवा विरोधकांना अडकवायचे असेल तर त्यांचा संबंध दाऊदशी जोडून मोकळे व्हायचे, हे त्यांचे धोरणच आहे. भारतीय जनता पक्षाचे सांगायचे तर दाऊद हे त्यांच्यासाठी प्रिय पात्रच बनले आहे. विरोधाची वैचारिक पातळी घसरल्याने भाजपाचे ‘‘दाऊद दाऊद’’ सुरू आहे. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
तसेच नवाब मलिक यांचे ‘डी’ गँगशी संबंध असल्याचे आरोपपत्र ‘ईडी’ने न्यायालयात सादर केले आहे. पाच हजार पानांचे हे आरोपपत्र आहे. त्या आरोपपत्रात किती तथ्य आहे, याचा फैसला लागायचा तेव्हा लागेल, पण नवाब मलिक यांना अडकविण्यासाठी ‘डी’ गँग वगैरेंचा संदर्भ जोडला जात आहे. असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले?; निलेश राणेंचा टोला
- “माणूसपण निभावणारा एकमेव राजकारणी…”, अविनाश जाधवांकडून राज ठाकरेंचे कौतुक
- पक्षनिष्ठा नसलेल्या व्यक्तीला भाजपात ठेवणे कितपत योग्य आहे?; ‘काँग्रेस’चा सवाल
- IPL 2022 SRH vs PBKS : पंजाबचा हैदराबादवर सोपा विजय; लिव्हिंगस्टोनची वादळी खेळी!
- IPL 2022 SRH vs PBKS : हरप्रीतनं हैदराबादला रोखलं..! पंजाबसमोर शेवट ‘गोड’ करण्यासाठी १५८ धावांचं लक्ष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

